Sunday, April 21, 2024

चारू असोपा आणि राजीव सेन मुलीसाठी आले एकत्र

देशचारू असोपा आणि राजीव सेन मुलीसाठी आले एकत्र

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे, पण ते दोघेही मुलगी जियानाच्या वाढदिवसासाठी सगळं काही विसरून एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. या पार्टीत संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सुष्मिताच्या दोन्ही मुलीही यावेळी होत्या. मात्र, या पार्टीत सुष्मिता स्वतः दिसली नव्हती.

चारू असोपानं राजस्थानमधील मारवानी व्यावसायिकाशी लग्न केले, परंतु नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर चारू नीरज मालवीयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. असे म्हटले जाते की, दोघांनीही राजस्थानमध्ये एंगेजमेंट केली होती, पण 2017 मध्ये हे नातेही तुटले. 2019 मध्ये चारूनं सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले. चारूचे हे दुसरे लग्न आहे.

राजीवचा आरोप होता की चारूनं तिच्या पहिल्या लग्नाबद्दल लपवून ठेवले होते. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या, परंतु सप्टेंबरमध्ये दोघांनी लग्नाला संधी देण्याची घोषणा केली. पण त्यांच्या नात्यातील कटुता आणखी वाढली. ऑक्टोबरमध्ये चारूनं राजीववर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles