Saturday, July 27, 2024

जॉनी सिन्सची लहानपणीची इच्छा होणार पूर्ण; एलॉन मस्क यांच्याकडे मागितली मदत

मनोरंजनजॉनी सिन्सची लहानपणीची इच्छा होणार पूर्ण; एलॉन मस्क यांच्याकडे मागितली मदत

ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलॉन मस्क सध्या जोरदार चर्चेत आहेत. अनेकांच्या ट्विटरला एलॉन मस्क नेहमीच उत्तर देत असतात. त्यांनी दिलेला रिप्लाय नेहमीच व्हायरल होतात. दरम्यान, अ‍ॅडल्ट चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक असलेला 44 वर्षीय जॉनी सिन्स एका मागणीमुळे चर्चेत आला आहे. जॉनी सिन्सने अॅडल्ट चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. मात्र आता त्याला अंतराळात अ‍ॅडल्ट चित्रपट शूट करण्याची इच्छा आहे. म्हणजेच जॉनी सिन्सला पृथ्वीच्या बाहेर जाऊन अंतराळात अॅडल्ट फिल्म बनवणारी पहिली व्यक्ती होण्याची इच्छा आहे. यासाठी सिन्सने एलॉन मस्ककडेमदत मागितली आहे.

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार जॉनी सिन्सने एलॉन मस्कला अंतराळात चित्रपट शूट करण्यासाठी मदत मागितली आहे. जॉनी सिन्सने मजेशीर पद्धतीने ही मागणी केली असली तरी याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत अ‍ॅडल्ट इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागणी वाढल्यामुळे, अॅडल्ट फिल्म निर्माते आणि अभिनेते वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपट शूट करू इच्छितात, जेणेकरून ते प्रेक्षकांचा अनुभव वाढवू शकतील.

VICE News या इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॉनी सिन्सने अवकाशामध्ये अॅडल्ट फिल्म बनवण्याबाबत सांगितले. तू तुझ्या चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. त्यापैकी तुझी आवडती भूमिका काय आहे? असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना जॉनी सिन्सने म्हटले की, “मला वाटते की डॉक्टर हे माझे सर्वात प्रसिद्ध पात्र आहे. पण मला अंतराळवीर व्हायला आवडते. मी अजून अंतराळात गेलो नसलो तरी, मी फक्त अंतराळ प्रवास सुरू होण्याची वाट पाहत आहे.”
यानंतर जॉनी सिन्सला, तुला अंतराळात अॅडल्ट फिल्म करणारा पहिला अभिनेता व्हायचे होते, हे अजूनही तुझे स्वप्न आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर “अंतराळात अॅडल्ट फिल्म करणारा पहिला अभिनेता व्हायला मला आवडेल. 2015 च्या सुमारास जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा कदाचित कोणतेही व्यावसायिक विमान अंतराळात गेले नाही. पण आता व्यावसायिक उड्डाणे अवकाशात जात आहेत. आता अंतराळात चित्रपट शूट करण्याचा कार्यक्रम बनवता येईल,” असे सिन्स म्हणाला.

याशिवाय, स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क देखील मला पाठिंबा देऊ शकतात, असे जॉनी सिन्सने सांगितले. सिन्सच्या मते, स्पेसएक्ससाठी देखील ही एक उत्तम जाहिरात असेल. स्पेसएक्स ही एक खाजगी रॉकेट निर्मिती कंपनी आहे जी अंतराळात व्यावसायिक उड्डाणांची व्यवस्था सुरू करणार आहे. दरम्यान, जॉनी सिन्सला लहानपणापासूनच अंतराळवीर बनायचे होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles