Friday, May 24, 2024

करीना-सैफमध्ये दुरावा ? कारणही आलं समोर

देशकरीना-सैफमध्ये दुरावा ? कारणही आलं समोर

बाॅलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे, करीना कपूर– सैफ अली खान. या दोघांचे असंख्य चाहते आहेत. या दोघांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. सैफ-करीना नेहमीच सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.

परंतु सैफ-करीना सध्या एकमेकांपासून लांब राहत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण करीना सध्या लंडनला तिची मावशी रीना जैनसोबत कौटुंबिक वेळ घालवत आहेत. तर सैफ आणि तैमूर मालदीवमध्ये वेळ घालवत आहेत.

सैफ-तैमूर मादलीवला जाण्यापूर्वी त्यांचा मुंबई विमानतळावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जबाबदार वडीलांप्रमाणे सैफने तैमूरचा घट्ट हात पकडल्याचंही दिसत आहे.

दरम्यान, करीना तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त असल्यानं सध्या तैमुरची काळजी सैफ एकटाच घेत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सोशल मीडियावर बाप-लेकाच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles