Thursday, March 28, 2024

“गांधींमुळे मोदींना बाहेरच्या देशात मान मिळतो”

दुनिया“गांधींमुळे मोदींना बाहेरच्या देशात मान मिळतो”

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानला भेट दिली. ‘मानगढ गड की गौरव गाथा’ या कार्यक्रमात ते आले होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत देखील उपस्थित होते. अशोक गेहलोत यांनी यावेळी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी ज्या देशात आहेत तो देश गांधीचा देश आहे. तो लोकशाहीवर चालतो. 70 वर्षानंतर आजही लोकशाही जिवंत आहे. जिथे लोकशाहीची मुळे मजबूत आहेत. जी खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे जगात आणि इतर देशात मोदींना मान मिळतोय, असं वक्तव्य गेहलोत आणि कार्यक्रमात बोलताना केलं.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आदिवासींचं देखील मोठं योगदान आहे. ज्याप्रमाणे जालियनवाल बाग घटनेतील लोकांना ओळखलं जातं. त्याचप्रमाणे मानगढच्या आदिवासी लोकांचे कष्ट इतरांना कळावेत अशी इच्छा त्यांनी देखील व्यक्त केली.

राजस्थान सरकारच्या ‘चिरंजीवी’ योजनेचा अभ्यास करावा. हे माॅडेल इतर राज्यात लागू करण्याचा विचार करावा, असंही गेहलोत कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी देखील गेहलोत याचं कौतुक केलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles