गुजरातमधील मच्छु नदीवरील मोरबी पूल कोसळला. यामध्ये 139 जणांचा मृत्यू झाला. या पुलाला झुलता पूल असं देखील म्हणतात. या दुर्घटनेमुळे देशात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बडे नेत्यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. या शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ठिकाणी पाहणी केली. या सोबतच आज मोदींचे गांधीनगर येथे रोड शोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र तो सुद्धा रद्द करण्यात आला.
मोरबी पूल येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मोदी यांनी रुग्णालयात जाऊन तिथल्या जखमींची भेट घेतली. यावेळी उपस्थित बचावकार्यात काम केलेल्यांची देखील भेट घेतली. येथे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
दरम्यान, माध्यमांच्या माहितीनूसार या घटनास्थळी सध्या एसआयटी समिती तपास करत आहेत. मोरबी येथे झालेल्या दुर्घटने नंतर विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केला. इतकंच नव्हे तर काॅंग्रेस आणि आप पक्षाकडून भाजपवर जोरदार टीका सुद्धा करण्यात येतीये.