Wednesday, November 20, 2024

विराट कोहली ‘या’ विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

खेलविराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

टीम इंडियाचा सध्या चर्चेत असणारा खेळाडू विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने एकट्याने जिंकून दिले आहेत. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावताच तो जुन्या फॉर्ममध्ये परतला. भारत आणि बांग्लादेश यांच्यात आज 2 नोव्हेंबरला सामना होत आहे. या सामन्यात विराट कोहली याच्या नावावर मोठा विक्रम होण्याची शक्यता आहे. विराटने केवळ 15 धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात ऐतिहासिक विक्रम असणार आहे.

T20 World Cupमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबतीत विराट कोहली सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बांग्लादेशविरुद्धच्या T20 विश्वचषकात त्याने आणखी 15 धावा केल्या तर तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. कोहलीच्या नावावर सध्या T20 विश्वचषकात 1001 धावा आहेत. महेला जयवर्धनेने T20 विश्वचषकाच्या इतिहासात 1016 धावा केल्या आहेत.

विराट कोहली याची फलंदाजी स्फोटक म्हणून ओळखली जाते. तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. त्याने 112 T20 सामन्यांमध्ये 3868 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका मोठ्या शतकाचा समावेश आहे. विराट हा आक्रमक फलंदाज आहे. तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला तोंड देऊ शकतो. त्याची फलंदाजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्यावेळी पाहायला मिळाली.
विराट कोहली याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी 100 हून अधिक सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 71 शतके आहेत. आपल्या टार्गेटचा पाठलाग करताना तो अतिशय आक्रमक फलंदाजी करतो. सध्याच्या T20 विश्वचषकात त्याने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध चांगला खेळ केला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles