Thursday, December 5, 2024

राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लगावली! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रराजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लगावली! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कवी कुसुमाग्रजांनी वेडात मराठेवीर दौडले सात असं म्हटलंय त्यातही काही चुकीचं नाही. ध्येयवेडेचं इतिहास घडवात, राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लगावली. कुठून कसं गेलो माहिती नाही. जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. राज ठाकरे आणि मी एकत्र येतोय खरं म्हणजे १० वर्षांचा बॅकलॉग भरुन काढतोय. अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी व्यक्त केली.

या मुहूर्ताप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी महेश मांजरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. वेडात मराठे वीर दौडले सात हा सिनेमा महेश माजरेकर यांनी हा सिनेमा आपल्यापुढं आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, बिगबॉस तसं सगळं पाहायला गेलं तर महेश मांजरेकर तुम्हीचं दबंग आहात, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची बांधणी, त्यावेळचं इंजिनिअरिंग, गडावरील तोफा हे सर्व पाहिल्यानंतर हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. हे पाहिल्यावर आपल्यासमोर दिव्य दृष्टीचा राजा समोर येतो. नक्कीच आपल्याला चांगलं यश मिळेल. मराठी आणि हिंदी कलाकारांच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी कलावंतांच्या पाठिशी उभं राहत होते. राज ठाकरे देखील कलावंतांच्या पाठिशी उभे राहतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान नवी चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अक्षयकुमार करणार आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात प्रतापराव गुजर यांची भूमिका प्रवीण तरडे करणार आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles