सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. ती टी-20 वर्ल्ड कपची. सुरवातीपासूनच ही मॅच रोमांचक वळण घेत आहे. पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्या दरम्यान देखील ट्विस्ट आले होते. असंच काही आजच्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यासंदर्भात झालं आहे.
हा सामना हारता हारता भारताने विजय मिळवल्याने सगळीकडं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. भारताने पाच धावा राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यांने नाणेफेक जिंकून गोलदांजीचा निर्णय घेतला होता. भारताने 20 षटकात 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या मात्र पावसामुळे त्यांना 16 षटकांत 151 धावांचं लक्ष्य मिळालं.
त्यामुळे पाऊस असाच राहिला असता तर भारत जिंकण्याची शक्यता कमी होती. पाऊस थांबल्याने थोडया वेळाने मॅच सुरू झाली. मात्र बांगलादेशला 16 षटकांत सहा विकेट्सवर केवळ 145 धावाच करता आल्याने भारत विजयी झाला. विराट कोहली ला ‘मॅन ऑफ दी मॅच’ चा किताब देण्यात आला आहे.