Friday, May 24, 2024

रेल्वेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मालवाहतुकीमधून मिळवला 92,345 कोटी रुपयांचा महसूल

देशरेल्वेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मालवाहतुकीमधून मिळवला 92,345 कोटी रुपयांचा महसूल

भारतीय रेल्वेच्या चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सात महिन्यांमधल्या मालवाहतुकीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील मालवाहतूक आणि त्याद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचा टप्पा मिशन मोडमध्ये पार केला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 22 या काळात एकत्रित आधारावर, गेल्या वर्षीच्या 786.2 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत 855.63 मेट्रिक टन मालवाहतूक झाली असून, गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत सुमारे 9% ची सुधारणा नोंदवण्यात आली. गेल्या वर्षीच्या 78,921 कोटी रुपयांच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्षात रेल्वेने 92,345 कोटी रुपयांची कमाई केली असून यामध्ये 17% टक्के सुधारणा झाली आहे.

ऑक्टोबर 2021 मधील 117.34 मेट्रिक टन माल वाहतुकीच्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये, 118.94 मेट्रिक टन इतकी माल वाहतूक झाली असून यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.4% सुधारणा झाली आहे. ऑक्टोबर 2021 मधील 12,313 कोटी रुपये मालवाहतूक महसुलाच्या तुलनेत, ऑक्टोबर 2022 मध्ये 13,353 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 8% सुधारणा झाली.

“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेसाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि अपारंपरिक वस्तूंच्या स्वरुपात रेल्वेकडे मालवाहतुकीचा नवीन ओघ येत आहे. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि जलद धोरण निर्मितीचा आधार असलेल्या व्यवसाय विकास केंद्रांचे काम यामुळे रेल्वेला हा यशाचा टप्पा गाठायला मदत झाली.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles