Wednesday, October 30, 2024

महाराष्ट्राला 75 हजार रोजगार; मोदींचा ‘मास्टर प्लान’

देशमहाराष्ट्राला 75 हजार रोजगार; मोदींचा ‘मास्टर प्लान’

नुकताच महाराष्ट्रातील टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. यातच गुरूवारी, 75 हजार रोजगार देण्याचा देशव्यापी कार्यक्रमाचा, महाराष्ट्रातील पहिला टप्पा पार पडला.

हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुव नार्वेकरांसह इतर नेतेही उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्र सरकार युवकांना रोजगार देण्याचं काम करत आहे. गृह विभागाकडून सुद्धा भरती होत आहेत. तसेच केंद्राच्या मुद्रा योजनेमार्फत सरकार मदत करत आहे. याचा फायदा सर्वाधिक महाराष्ट्रानं घेतला. ग्रामीण भागात बचत गट सुरू केल्यानं, महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतोय.
महाराष्ट्रात 2 लाख कोटी किंमतीचे 225 प्रकल्पांची तरतूद करण्यात आली असल्याचंही, मोदींनी सांगितलं आहे. जग जसं बदलत आहे, तशा नवीन नोकऱ्या सरकार निर्माण करत असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles