वाढलेल्या महागाईमुळे ही दिवाळी जरा खर्चाची झाली आहे. यातच आता वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतात पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची कपात होऊ शकते. गेले सहा महिने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मुबंई,दिल्ली,कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये हे दर स्थिर होते.
सध्या गुजरात आणि हिमाचल राज्याच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये देखील काही दिवसांनी निवडणुका जाहिर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर देखील पेट्रोल-डिझेल दरात कपात होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.07 प्रति लिटर अशी आजची किंमत आहे. मुबंई मध्ये पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.