शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई टळली असं बोललं जात होतं. पण, आता सरनाईकांना मोठा धक्का बसला आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांची NSEL घोटाळा प्रकरणात 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे.
ठाण्यातील 1 फ्लॅट आणि मिरारोड येथील एक जमीन ईडीने जप्त केली होती. 11.4 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
ईडी कारवाई टाळण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची जोरदार चर्चा होती. असं असताना सुद्धा सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.