राज्यात सत्तांतरानंतर राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. अनेक नेतेमंडळींच्या भेटींना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घतलेली. त्यावेळी राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगलेली.
यातच ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. भिडे हे आज मंत्रालयात एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला गेले असताना त्यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला.
त्यावर भिडेंनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. ‘तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. प्रत्येक स्त्री भारतमातेचं स्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी केलं आहे.
दरम्यान, भिडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिलेत. अशाप्रकारे आज पुन्हा एकदा ते वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत.