Friday, May 24, 2024

शाहरुख खानची दिवसाची कमाई १ कोटी पेक्षा अधिक

मनोरंजनशाहरुख खानची दिवसाची कमाई १ कोटी पेक्षा अधिक

अभिनेता शाहारुख खानची संपूर्ण देशभरात ओळख आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने लहानांपासून ते वृधांपर्यंत सर्वांच्या मनात घर केलं. आज सुद्धा प्रेक्षक शारुखचे चित्रपट आवडीने पाहतात.

शारुख खानसोबत हिंदी सिनेसृष्टीत अमीर खान आणि सलमान खान यांनी सुद्धा आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात नाव कोरलं. मात्र या तिघांमध्ये सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्थिकदृष्ट्या तिघेजण सुद्धा श्रीमंत आहेत. पण,अभिनेता शारुख खान एका दिवसाची सुमारे 1.4 कोटी रुपयांची कमाई करतो. त्यासोबतच त्याची संपत्ती सुमारे 5 हजार 593 कोटी रुपये एवढी आहे. अभिनेता सलमान खान एका दिवसात 1.01 कोटी रुपये कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती 60 मिलियन डॉलर्स म्हणजे 2 हजार 900 कोटी रुपये आहे.
तर दूसरीकडे बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अमीर खानची एका दिवसाची कमाई सुमारे 33.47 लाख रुपये आहे. तर एकूण संपत्ती 225 मिलियन डॉलर अर्थात 1 हजार 800 कोटी रुपये आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles