चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करावी हे अनेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. त्यातच नोकरी मिळत नाही म्हणून अनेक जण जीवन संपवत असल्याचंही अनेकदा कानावर येतं. तरुणांसोबत महिलावर्गाल देखील चांगली नोकरी करण्याची इच्छा असते.
जुन्या काळात स्त्रीने फक्त चूल आणि मूल पहायचं असं मानलं जायचं. मात्र आजच्या काळात हा समज मोडीत काढत स्त्रीसुद्धा मोठमोठ्या पदांवर कार्यरत असल्याचं दिसतं. अशीच स्वप्न बाळगणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुप येत्या काळात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध करणार आहे.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप मोठी योजना आणत आहे. टाटा ग्रुपकडून संपूर्ण कंपनीच महिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तमिळनाडूतील होसुरमध्ये टाटा ग्रुपच्या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिकसह आयफोनचेही पार्ट बनवले जातात. या कंपनीत 5000 महिला काम करतात.
या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना 16,000 पेक्षा जास्त वेतन यासोबतच जेवणाची आणि राहण्याचीही सुविधा दिली जातेय. मात्र टाटा समुहाकडून या कंपनीतील भरतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.