Saturday, June 22, 2024

विराट कोहलीचे लाखो ‘इंस्टा’फाॅलोअर्स घटले

खेलविराट कोहलीचे लाखो ‘इंस्टा’फाॅलोअर्स घटले

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू विराट कोहली सध्या जोरदार चर्चेत आहे. बुधवारी बांगलादेश विरूद्ध झालेल्या सामन्यात विराटनं 44 बाॅलमध्ये 64 धावा करून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला.

तसेच विराट टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यामुळं विराटचं क्रिकेट विश्वात जोरदार कौतुक सुरू आहे. त्याचे चाहतेही प्रचंड खुश आहेत.

तसेच विराट कोहलीचे सध्या इंस्टाग्रामवर 22 कोटी फाॅलोअर्स आहेत. सर्वाधिक फोलोअर्स असणारे भारतीय व्यक्तिमत्व म्हणून विराटकडं पाहिलं जात. परंतु नुकतंच विराटचे अवघ्या काही तासातच लाखो फाॅलोअर्स कमी झाले आहेत.
नुकतंच इंस्टाग्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं, यूजर्सला त्याचा फटका बसला. अनेकांचे फाॅलोअर्स तांत्रिक बिघाडामुळं आपोआप कमी झाले. याचाच सामना विराटलाही करावा लागला. त्याचे काही तासातच लाखो फाॅलोअर्स कमी झाले. तसेच त्याचे अकाऊंट पाहायला , पोस्ट पाहायला अडचण येत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसेच इंस्टाग्रामानं ही दुरूस्ती केली आहे, परंतु तरीही विराटचे कमी झालेले फाॅलोअर्स परत मिळाले नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles