Sunday, March 23, 2025

महाराष्ट्रात राजकारणात खळबळ; अजित पवार ‘नॉट रिचेबल’

देशमहाराष्ट्रात राजकारणात खळबळ; अजित पवार ‘नॉट रिचेबल’

एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशनालाही शिर्डीत अजित पवार हजर नव्हते. या शिबीरात पहिल्या दिवशी अजित पवार यांचं जवळपास दीड तास भाषण झालं. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयातून थेट शिबीराला हजेरी लावली होती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले होते. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं.
दरम्यान, अजितदादा गेले कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजितदादा नॉट रिचेबल असल्यानेराजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles