माजी खासदार सुधीर सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. खरं तर काँग्रेस फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं, असा आरोप सुधीर सावंत यांनी केलाय.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी माफीया विरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रात दंगल घडवून सुधाकर नाईक यांना मंत्रिपदावरून हटवलं. हा खरा तो देशद्रोह आहे, असा आरोप माजी खासदार सुधीर सावंत यांनी केला.
खरं तर काँग्रेस फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यामुळे गद्दार कोण? हे शरद पवारांनी लक्षात ठेवावं, अशी टीका खोचक माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली आहे.
देश द्रोह करण्याचं पाप शरद पवार यांनी केलं आहे. हे अगदी रेकॉर्डवर आहे. व्होरा कमिटीचा जो अहवाल आलाय त्यामध्ये यात याचा उल्लेख आहे, असंही सावंतांनी सांगितलं.