Thursday, October 3, 2024

दिपाली सय्यद शिंदे गटात

देशदिपाली सय्यद शिंदे गटात

अभिनेत्री दिपाली सय्यद या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशात दिपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

स्वतः दिपाली सय्यद यांनी आज आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. दिपाली सय्यद यादेखील ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळं या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होणार, असंही दिपाली सय्यद यांनी जाहीर केलं आहे.
दिपाली सय्यद या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालीच नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles