Tuesday, July 23, 2024

नितीन गडकरी म्हणाले, “आर्थिक सुधारणांसाठी देश डॉ. मनमोहन सिंह यांचा ऋणी…”

देशनितीन गडकरी म्हणाले, “आर्थिक सुधारणांसाठी देश डॉ. मनमोहन सिंह यांचा ऋणी…”

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं तोंडभरून कौतुक केलंय. आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असं नितीन गडकरी म्हणालेत.

लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे. माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.
उदार आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकते, याचे चीन हे उत्तम उदाहरण आहे, असंही गडकरी म्हणाले.
दरम्यान, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक भांडवली खर्च गुंतवणुकीची गरज असल्याचंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles