Wednesday, May 22, 2024

‘संजय राऊत इज बॅक’…! 102 दिवसानंतर तुरुंगातूनबाहेर येणार

देश‘संजय राऊत इज बॅक’…! 102 दिवसानंतर तुरुंगातूनबाहेर येणार

‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊतांना 100 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. पीएमएले कोर्टाकडून राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला.

राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला आहे. तसेच राऊत यांना जामीन दिल्याने ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
दरम्यान, ईडीककडून राऊत यांच्या जामिनाला विरोध करण्यात येणार आहे. राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ईडी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles