Friday, May 24, 2024

‘शिवप्रताप गरुडझेप’ OTT वर दिसणार

maharashtra‘शिवप्रताप गरुडझेप’ OTT वर दिसणार

बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर आता ‘टीएफएस प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार आहे. 4 नोव्हेंबरला या चित्रपटाचा वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर रंगला.

या प्रदर्शनाबाबत डॉ. अमोल कोल्हे सांगतात की, ‘आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असं कोल्हे म्हणालेत.
‘जगदंब क्रिएशन्स’ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles