ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले होते. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. अजित पवार गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर याबाबत खुद्द अजित पवारांनी खुलासा केला आहे.
अजित पवार यांनी मावळातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी मी आजारी असल्याने आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही, असं स्पष्टीकरण दिलंय.
दादा वाचून ह्यांचं काय नडतं काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची, असं म्हणत अजित पवारांनी मिडीयाला झापलं.
मीडियावर काहीही बातम्या देतात. गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबरला मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या, असं अजित पवारांनी सांगितलं.