इंग्लंडकडून टीम इंडियाला तब्बल 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाचा पराभव करुन इंग्लंडच्या टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केलाय.
इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. कॅप्टन जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
169 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात टीम इंडियाचे गोलंदाज अपयशी ठरलेत. अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीसह टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांना या सामन्यात जराही कमाल दाखवता आली नाही.
दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या सर्वात लाजिरवाण्या पराभवांपैकी हा एक असल्याची चर्चा सोशल मीडियावरही सुरु झाली आहे.