Saturday, June 3, 2023

राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन

देशराहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन

केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीये. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे.

राहुल गांधी यांची यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. यात्रेत त्यांना असंख्य नागरिक भेटायला येत आहेत. यात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण आहेत. यात नांदेडचा चिमुकला सर्वेश हाटणे देखील राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता.
सर्वेशदेखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. भविष्यात तुला काय बनायचंय, हे विचारलं. त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय, असं सांगितलं.

राहुल गांधींनी त्याला कंप्यूटर येतं का?, असं विचारलं असता, त्याने नाही असं उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी संवेदनशीलता दाखवत आज त्याला कंप्यूटर भेट म्हणून दिलं. राहुल गांधींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles