एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक झटके बसले आहेत. मात्र आता काँग्रेसचं टेंशन देखील शिंदेंनी वाढवलं आहे. कारण शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केलाय.
विदर्भातील ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी शिंदे गटात येणार आहेत. या शिवाय विदर्भातील ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुखही शिंदे गटात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.
तुमाने यांनी काँग्रेसचे माजी आमदारही शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे कोणते माजी आमदार शिंदे गटात येणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी फूट पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच काँग्रेसला देखील खिंडार पडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.