राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
तरीही त्यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल होतो हे काय चाललंय. ठीक हे राजकीय मतभेद असू शकतात पण अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर लोकच खपवून घेणार नाहीत. दिवस बदलत असतात हे त्यांनीही लक्षात ठेवावं, असा इशाराही पवार यांनी दिलाय.
आव्हाड यांनी अजिबात राजीनामा देऊ नये. माझी आव्हाडांना विनंती हे की त्यांनी राजीनामा अजिबात देऊ नये. सरकार येत असतात जात असतात. पण असं डगमगून जायचं नसतं, असं अजित पवार म्हणालेत.
मला माहिती हे आव्हाडांना टार्गेट केलं जातंय. जनताच हे सर्व बघतेय. तो व्हिडिओ मी पण पाहिला. ज्येष्ठ नेत्यांना वाट मोकळी करून द्यायची असते तेच त्यांनी केलं. त्यात आव्हाड काहीही चुकीचं वागलेले नाहीत, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं.