राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कळवा-मुंब्र्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळतंय. आता या प्रकरणावर भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणावर ट्विट केलं आहे. विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कायर्यकर्ते आक्रमक झालेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा बंदची हाक दिली आहे. मुंब्रा येथील अमृत नगर, गुलाब पार्क आणि कौसा या परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.