Thursday, April 25, 2024

भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट विक्रम-एस 15 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित होणार

देशभारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट विक्रम-एस 15 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित होणार

अंतराळ क्षेत्रात भारताने अनेक यश संपादन केले आहे. पण आता भारतीय खाजगी कंपन्याही या क्षेत्रात उतरत आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील लॉन्चपॅडवरून पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट विक्रम-एस प्रक्षेपित करणार आहे. हैदराबादस्थित स्पेस स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने मंगळवारी याची घोषणा केली आहे.

भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट विक्रम-एस हे स्कायरूट एरोस्पेसचे पहिले मिशन आहे ज्याला प्ररंभ असे नाव देण्यात आले आहे. या मिशनमध्ये दोन भारतीय आणि एक परदेशी पेलोड असेल. स्कायरूट एरोस्पेस शुक्रवारी एक विधान ट्विट प्रसिद्ध करत म्हंटले आहे ‘हृदयाचे ठोके अधिक वेगवान होणार आहेत आणि सर्वांच्या नजरा आकाशाकडे असतील.’

15 नोव्हेंबर 2022 रोजी हे मिशन सुरू केले जात आहे. स्कायरूट एरोस्पेसचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, क्षेपणास्त्र प्रक्षेपण सकाळी 11:30 वाजता होईल. भारतातील पहिली खाजगी अंतराळ कंपनी रॉकेट प्रक्षेपण मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी ही एका नव्या युगाची सुरुवात असेल.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून स्कायरूटच्या प्रक्षेपण वाहनाला विक्रम असे नाव देण्यात आले आहे. विक्रम-एस रॉकेट हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे जे तीन ग्राहक पेलोड वाहून नेईल आणि विक्रम सीरिजच्या स्पेस लॉन्च व्हेइकल्समधील बहुतेक तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यात मदत करेल. ‘विक्रम’ मालिकेत विक्रम I, II आणि III असे तीन रॉकेट आहेत. हे रॉकेट्स ब्रॉडबँड इंटरनेट, जीपीएस आणि आयओटी यांसारख्या दळणवळण सेवांना मदत करतील.

स्कायरूट एरोस्पेस ही हैदराबाद येथील खाजगी कंपनी आहे. स्कायरूट हे पहिले स्टार्टअप आहे ज्याने रॉकेट लॉन्च करण्यासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार केला आहे. परवडणाऱ्या आणि कमी किमतीच्या अंतराळ उड्डाणातील प्रवेशातील अडथळे दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles