सरफरोश, वास्तव या सारख्या सुपरहीट चित्रपटात काम करणारे दिग्गज अभिनेते सुनिल शेंडे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. बाॅलिवूड चित्रपटांसह त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडली.
बाॅलिवूडमधील गांधी, खलनायक, जमीन या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या, तर मराठीमधील निवडूंग, आपली माणसं, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोरं या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केली.
वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, ऋषिकेश आणि ओमकार ही दोन मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
सोमवारी (दि.14) दुपारी मुंबईमधील हिंदु समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले. सुनिल शेंडे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील नावाजलेले अभिनेते होते. त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीत शोक पसरला आहे.