अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःच्याच समाजाचं कौतुक केलं आहे.
आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. ब्राह्मण इतरांपेक्षा जास्त बुद्धिजीवी आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.
अखिल भारतीय बहुभाषीय ब्राम्हण महासंघांच्या मागण्यांविषयी मी सकारात्मक असल्याचं सांगत महासंघाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभी असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.