पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. यात उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता. यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आली आहे.
पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही. शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का? यावर दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का? यावर दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.