ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली.
आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाडांना अटकपूर्व जामीन दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एसीपी सोनाली ढोले यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे. आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल. त्यांना अटक पूर्व जामीन देवू नये. तसंच वर्तकनगर पोलिसांनी दिलेल्या जामिनात अट आहे. जामिनावर असताना कोणताही गुन्हा करु नये, अशी मागणी ढोले यांनी केली.