Sunday, May 19, 2024

सुपरस्टार महेश बाबूंवर कोसळला दुःखाचा डोंगर

देशसुपरस्टार महेश बाबूंवर कोसळला दुःखाचा डोंगर

दिग्गज अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं आज निधन झालं. पहाटे 4 वाजता हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. सोमवारी मध्यरात्री कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

कृष्णा हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील होते. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार झाले. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. इंदिरा देवी या कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांनी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला.
कृष्णा हे इंडस्ट्रीपासून दूर आहेत. कोणत्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांनी आपले प्राण गमावले. दीर्घ आजारानंतर 8 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं होतं.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles