Saturday, July 27, 2024

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का!

देशनिवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का!

गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकाची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 डिसेंबरला आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ८ डिसेंबरला होणार आहे. तर 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश येथे निवडणूक पार पडली असून त्याचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रातील 2024 ला होणाऱ्या निवडणुकीसाठी देखील आतापासून तयारी सुरू आहे. कारण सत्तांतर झाल्यानंतर मविआ सरकार पडलं ज्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांना धक्का बसला आहे. ठाकरे गटात आता काहीच नेते राहिले आहेत. काँग्रेसची पदयात्रा नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली होती. सध्या राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील प्रबळ गट असल्याचं म्हणलं जात आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर देखील भाजपला टक्कर देण्याची तयारी राष्ट्रवादी करत आहेत. लोकसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी अनेक पक्ष एकत्र आल्याचं पहायला मिळालं. ज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील सामील होते.
अशातच आता पहायला गेलं तर महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस जरा अडचणीत असल्याचं समजतंय. कारण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सध्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे 12 आमदार लवकरच शिंदे गटात सामील होतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. शरद पवार यांची प्रकृती देखील सध्या बरी नसल्याचं पहायला मिळतंय. यातच आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार कांधल जडेजा यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने जडेजांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादीने पोरबंदरमधील कुतियाना मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर जडेजांनी हा निर्णय घेत राजीनामा दिला.

कांधल जडेजा हे गेल्या 2 टर्मपासून कुतियाना विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 2012 आणि 2017 मध्ये ते पोरबंदरच्या कुटियाणा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेलीये.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles