सपाचे आमदार अबू आझमींवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आता समोर आली आहे. अबू आझमींच्या मुंबईतील राहत्या घरी इन्कम टॅक्स आणि ईडीकडून छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर ते अमरावती दोऱ्यावर असताना त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
संपत्तीवरील छापेमारीचं वृत्त अबू आझमी यांनी नाकारलं असलं तरीही माझ्या व्यवसायासंबंधी काही प्रकरण असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईतल्या घरी माझी पत्नी असून तिच्याशीही माझं आताच फोनवर बोलणं झालंय. कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असं अबू आझमी म्हणाले.
आयकर विभागाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या संपत्तीवर छापेमारी झाल्याचं वृत्त आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांसंबंधीचे आरोप आयकर विभागाचे असल्याचं म्हटलं जातंय. आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता और लखनौ आदी शहरांतील 30 ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे.
दरम्यान, अबू आझमी हे अकोला दौऱ्यावर होते. येथील दौरा अबू आझमी यांनी अचानक रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाला झाले आहेत.