Thursday, September 19, 2024

थंडीतील खोकल्यासाठी सोपे घरगुती उपाय

लाइफस्टाइलथंडीतील खोकल्यासाठी सोपे घरगुती उपाय

थंडीचे दिवस सुरु झाले आहेत, परंतु या दिवसात देखील वातावरणात देखील सातत्याने बदल होत आहे यामुळे या दिवसात अनेकांना खोकल्याचा त्रास होतो आहे. बऱ्याचजणांना तर रात्री खोकला पूर्ण हैराण करून सोडतो. कधीकधी तर रात्री इतका खोकला येतो की, त्या व्यक्तीसोबतच घरातील सर्वांचीच झोप उडते. पण तुम्हाला माहिती आहे का, काही घरगुती सोप्या उपायांनी हा खोकला कमी करता येतो.

खरतर बदलत्या तापमानाशी शरीराचे तापमान जुळत नाही. त्यामुळे आरोग्य बिघडून सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. काही लोकांना दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला येतो. अद्याप याला कुठलाही आधार नसला तरी, रात्री झोपताना सतत येणाऱ्या खोकल्यामुळे फक्त तुमचीच नाही तर घरातील सर्वांचीच झोप खराब होते. पण तुम्ही असे काही घरगुती उपाय वापरून रात्री येणाऱ्या खोकल्यापासून होणारा त्रास कमी करू शकता.

आले आणि मध हे दोन्ही घटक केवळ खोकलाच नाही तर शरीराच्या इतर समस्याही सहज दूर करू शकतात. जर तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होत असेल, तर आल्याचा रस काढून त्यात थोडा मध मिसळा. तयार केलेली ही पेस्ट खा आणि झोपा. यानंतर, चुकूनही पाणी पिऊ नका. सुमारे एक आठवडा याच पद्धतीने आले आणि मधाची पेस्ट घेतली, तर खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होईल.

गुळ हा असा नैसर्गिक घटक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. आल्याबरोबर (Ginger) गुळ खाल्ल्यास खोकला काही दिवसात दूर होतो. एका वाटीत थोडा गुळ गरम करून त्यात आल्याचा रस घाला. ही पेस्ट खाऊन झोपा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
काळी मिरी, मीठ व मधाची पेस्ट बऱ्याचदा चुकीचं खाल्ल्यामुळे किंवा अ‍ॅलर्जीमुळे रात्रीच्या वेळी खोकला येतो. परंतु यामुळे पुरेशी झोप न झाल्यास दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम बिघडू शकतो. यापासून आराम मिळण्यासाठी एका वाटीत काळी मिरी बारिक करून घ्या, व त्यात थोडे मीठ टाका, आणि त्यात थोडा मध घालून ही पेस्ट सेवन करा. यामुळे खोकल्यापासून लवकर सुटका मिळेल.

घरगुती काही सोप्या उपायांनी खोकला कमी करता येतो. मात्र, खोकल्याची समस्या गंभीर नाही, म्हणुन या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. तर खोकला जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांकडून प्रथम काही वेगळा आजार नाही ना, याची खात्री करून घेणेही गरजेचे आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles