सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने घाऊक महागाईची आकडेवारी काल जारी केली आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये अंड्याच्या किमती 0.18% कमी झाल्या, तर तेलाच्या किमती 2.15% नी घसरल्या. यासोबतच मागील महिन्याच्या तुलनेत भाजीपाला 7.77%, तृणधान्ये 12.08% आणि मसाल्यांमध्ये 18.02% ची वाढ झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या किमती 7.69% आणि मांस आणि माशांच्या किमती 3.08% ने वाढल्या. याशिवाय फळांच्या किमती 5.20%, इंधनाच्या किमती 9.93% वाढल्या आहेत.