• चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाला दिले होते आव्हान
• निवडणूक आयोगाने निर्णय घेण्याचे न्यायालयाचे निर्देश
शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती. इतकेच नाही तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनचं धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं होत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार पडली. मात्र यावेळी न्यायालयाने उद्धव ठाकरेंना झटका देणारा निर्णय दिला.
दरम्यान, 3 नोव्हेंबरच्या आत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून आपापल्या कडची कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत. तसेच याप्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.