Tuesday, July 23, 2024

‘आप’चा मंत्री जेलमध्ये भोगतोय व्हीव्हीआयपी सेवा..

दिल्ली‘आप’चा मंत्री जेलमध्ये भोगतोय व्हीव्हीआयपी सेवा..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी ही तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

कोठडीमध्ये सत्येंद्र जैन यांची कशा प्रकारे सेवा सुरू आहे, याचा व्हिडीओ समोर आला आहे. सत्येंद्र जैन जेलमध्ये पायाची मालिश करून घेत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जैन हे मस्तपैकी एका पलंगावर झोपून एका व्यक्तीकडून मालिश करून घेत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या कोठडीमध्ये इतर लोकही दिसून आले आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सप्टेंबर महिन्यातला आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर सत्येंद्र जैन यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आलेलं नाही. अजूनही ते बिनाखात्याचे मंत्री आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles