एका बापाचे असाल तर, मला बीडमध्ये निवडणुकीत हरवूनच दाखवा, असं आव्हान करुणा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेंना दिलं आहे. त्या मुबंईत बोलत होत्या.
एकीकडे महिलांचा सन्मान वगैरे गोष्टी बोलल्या जात आहेत. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वक्तव्य केलं. पण मला सांगा सुप्रिया सुळे या एकच महिला आहेत का की, ज्यांच्यावर अन्याय झाला. माझ्यावेळी मला महाविकास आघाडीने न्याय दिलेला नव्हता. सुप्रिया सुळे या मोठ्या राजकारणी आहेत म्हणून त्यांच्या समर्थन उभं राहिले, असंही ते म्हणालेत.
धनजंय मुंडे यांच्याकडून घटस्फोटा द्यावा यासाठी माझ्यावर दबाव येत होता. तेव्हा मी मीडियासमोर आले होते. तेव्हा मी महिला आयोगाकडे याबाबत सरकार तक्रार सुद्धा दिली. मात्र यावर आजपर्यंत त्यावर कसलीही कार्यवाही झालेले नाही. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही पत्र दिले, आता पाहुयात ते कधी कारवाई करतात, असं करूणा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, माझ्या शापामुळेच महाविकास आघाडी सरकार पडले, हे सरकार पुन्हा कधी येणार नाही, असंही करूणा मुंडे म्हणाल्यात.