Monday, December 2, 2024

“महाराष्ट्राने भरभरून दिलेल्या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही” – राहुल गांधी

दिल्ली“महाराष्ट्राने भरभरून दिलेल्या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही” - राहुल गांधी

बुलडाणा | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलडाण्यातील शेगाव येथे पोहोचली असून येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजप देशात भीती आणि हिंसा पसरवण्याच काम करत आहे. नेमक त्याचं विरोधात ही आमची यात्रा आहे. यात्रेच लक्ष जनतेचं दु:ख समजून घेण्याचं आहे. लोंकाशी भेटल्यावर लोकांच्या भावना समजतात. द्वेषाने देशाचे नुकसान होते. तसेच यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे आभार देखील मानले.
देशाला दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला दिलेल्या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही, असं म्हणत त्यांनी आपलं भाषण संपवलं या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
सावरकर यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेवर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून मित्रपक्ष शिवसेनेने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर ते आपल्या भाषणात काही बोलतील, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र त्यांनी याबाबत सावरकरांवर केलेल्या टीकेचा आणि त्या वादाचा साधा उल्लेखही केला नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles