काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.
एका मिठाईच्या दुकानात पत्रं पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, राहुल गांधींनाधमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडालीये. त्यामुळे राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून धमकीचं पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून 24 नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत