आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेयांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. आता यावरून रवी राणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचं उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.
देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी आणि त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या विरोधात भाजप, मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते तसेच शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत.