राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सोबतच राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार आहे. आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन, आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 35 हजार 629 कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजूरी देण्यात आलीये.