सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय. 24 वर्षीय बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अँड्रिलावर उपचार सुरू होते.
अँड्रिला 24 वर्षांची होती. मल्टिपल कार्डिॲक अरेस्टमुळे 1 नोव्हेंबरपासून तिची प्रकृती चिंताजनक होती. हावडामधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
अँड्रिला ही मुर्शिदाबाद इथली राहणारी आहे. 2007 मध्ये तिने ‘झुमर’ या टीव्ही शोमधून पदार्पण केलं. त्यानंतर तिने जियो काथी, जिबोन ज्योती यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. ‘भगर’ या वेब सीरिजमध्येही तिने भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे.
दरम्यान, अँड्रिलाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जातोय. अँड्रिलाने फार कमी वेळात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मात्र वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अँड्रिलाने जगाचा निरोप घेतला.