काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यावरून राज्य वाद सुरू झाला होता. अनेकांनी राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला होता. अशात आता गांधींचे पणतू तुषार गांधींनी देखील सावरकरांवर बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदूक मिळवून देण्यासाठी त्याला सावरकरांनी मदत केली होती, असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे. तुषार गांधी यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवण्यासाठी मदत केली होती. हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे बंदूक नव्हती. हे मी म्हणत नाही कपूर आयोगाने नमूद केलं आहे. 26 आणि 27 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटायला गेले होते. अशी बातमी पोलिसांकडे होती. त्यात तथ्य आहे, असं तुषार गांधी यांनी सांगितलं.
1930मध्येही महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी गांधींच्या सहकाऱ्यांना सावध केले होते. त्यानंतर प्रबोधनकारांनी राज्यातील सनातनी हिंदूच्या नेत्यांना खडसावलं होतं, असंही त्यांनी सांगितलं होतं.