राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये. आता यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय पण बोलायच, कुणाबद्दल पण बोलायच त्याला भाजपाचा पाठिंबा नाही. हे राजकारण होतंय. पाठबळ कुणी देत नाही. राज्यपालला इथे नाही, कुठे ही ठेवू नका. वय झालं, विस्मरण होतयं. काय बोलतोय ते त्यांना कळत नाही. घरी जावू द्या, नाहीतर वृध्दाश्रमात जावू द्या. त्रिवेदीला पहिलं बाहेर काढा. नाहीतर मी माझ्या पद्धतीने बघेल, असा इशाराही उदयनराजेंनी दिलाय.
ही विकृती आहे. अशा लोकांना पक्षातून बाहेर काढायला हवं. त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारांना फेकून दिलं पाहिजे. जिथे दिसेल तिथे त्रिवेदीला चोपून काढलं पाहिजे, अशा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रत्येक पक्ष शिवाजी माहाजारांचं नाव घेतल्याशिवाय पक्षाची राजकीय वाटचाल सुरू करत नाही. राज्यपाल पदाचा सन्मान आहे पण त्यांना काय बोलायचं हे कळलं पाहिजे. त्यांनी दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं याकडे लक्ष घालण्याची गरज आहे, असं उदयनराजे म्हणालेत.