Monday, December 11, 2023

अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा

देशअभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अचानक खालावली, त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची बातमी आली. ही बातमी समजल्यानंतर त्यांची मुलगी नेहा गोखले आणि पत्नी वृषाली गोखले यांनी ही बातमी अफवा असल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले. आणि आता त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी त्यांच्या मित्राचे आरोग्य अपडेट शेअर केले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

“विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि हदयाची क्रिया स्थिर आहे,” अशी माहिती शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles