Thursday, October 24, 2024

विदर्भ आणि कोकणात मिळालं घबाड!

महाराष्ट्रविदर्भ आणि कोकणात मिळालं घबाड!

मुंबई :महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असेही त्यांनी म्हंटल.

महाराष्ट्राच्या भूर्गाभात कोळसा, बॉक्साईट, लोखंड या खनिजांबरोबरच सोनेही दडले असल्याची माहिती पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक आढळून आहेत. या खानी वन्यजीव क्षेत्रात असल्याने येथून सोने काढले जाणार का या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या वृत्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल राज्याच्या खनिकर्म विभागाला मिळाला आहे. chandrapur

विदर्भयासोबतच कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता आहे. खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. या बाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. तयानुसार राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles